ग्लोबल टीचर रणजीतसिंह डिसलेंचा शिक्षक पदाचा राजीनामा

दोन वर्षांत ते 'डायट'कडे फिरकलेच नाहीत
Ranjitsinh Disale
Ranjitsinh DisaleDainik Gomantak

आंतरराष्ट्रीय ग्लोबर टीचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले गुरुजींनी राजीनामा दिला आहे. रणजितसिंह डिसले यांनी माढा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे 7 जुलै 2022 रोजी राजीनामा सादर केला आहे. ( Global teacher Ranjitsinh Disale resigns as a teacher )

Ranjitsinh Disale
पुराच्या पाण्यात गाडी घातली अन् चार जणांना जलसमाधी, चार जणांचा शोध सूरु

जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी याला दुजोरा दिला आहे. सतत गैरहजर राहिल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेने रणजितसिंह डिसले यांच्याबाबत चौकशी अहवाल तयार केला आहे. शिक्षण विभागाने हा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे शिक्षण विभागाने दिला आहे. कारवाई होण्याअगोदर ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांनी राजीनामा मंजूर व्हावा, असे पत्र गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केले आहे.

Ranjitsinh Disale
Presidential Election: द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने दिला पाठिंबा

उपशिक्षक रणजितसिंह यांचा चौकशी अहवाल सादर

सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले उपशिक्षक रणजितसिंह डिसले यांनी 2017 ते 2020 या कालावधीत काय केले, याबाबत सखोल चौकशी झाली आहे. याबाबत एक फाईल तयार करण्यात आली आहे. हा चौकशी अहवाल जिल्हापरिषद सीईओंकडे गोपनीयरित्या सादर करण्यात आला आहे. परंतु, सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी हे अगोदर आषाढी वारी आणि आता कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याने डीसले गुरुजींचा अहवाल सीईओ नी वाचला नाही आणि कारवाई झाली नाही. पण रणजितसिंह डिसले यांनी कारवाई होण्याअगोदर 7 जुलै रोजी माढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिंदे यांकडे राजीनामा सादर केला आहे.

डायटकडे फिरकलेच नाही अशी तक्रार प्राप्त

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण, दोन वर्षांत ते 'डायट'कडे फिरकलेच नाहीत. त्यांनी ग्लोबल टिचर अ‍ॅवार्डची तयारी करण्यातच तो कालावधी घालवला, अशी तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आणि त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com