पुणे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी गोवा पोलिसांच्या जाळ्यात

गोव्यातील हणजूण येथील स्टार्को जंक्शनवर एका व्यक्तीला अंमली पदार्थ विकण्यासाठी जात होता
संशयित मुस्ताकी रझाक धुनिया
संशयित मुस्ताकी रझाक धुनियाDainik Gomantak

म्हापसा : राजगड (पुणे) येथील पोलिसांनी (Pune Police) मागिल सोमवारी अंमली पदार्थ (medication case) व्यवहारातील टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी एका संशयित अंमली पदार्थ तस्कराला घेऊन हणजूण येथे फिल्मी स्टाइल सापळा रचला होता. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांना चकमा देऊन संशयिताने पळ काढल्याने राजगड पोलिसांची योजना धुळीस मिळाली होती.

मात्र गोवा पोलिसांनी माशेल भागातून या संशयिताच्या मुसक्या आवळून त्याला राजगड पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतरत मोकळा श्वास घेतला. मुस्ताकी रझाक धुनिया (30, मूळ नेपाळ) असे या संशयिताचे नाव आहे. आणि पुणे पोलिसांच्या तावडीतून सुटलेल्या या संशयिताला गोवा पोलिसांना पकडले आहे.

संशयित मुस्ताकी रझाक धुनिया
वेश्या व्यवसायप्रकरणी दोघांना अटक: तीन मुलींची सुटका

दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने एका व्यक्तीला अटक केली होती हा व्यक्ती पुण्यातून गोव्याला जात होता. पुणे जिल्ह्यातील गोवा जाणाऱ्या बसमधून तो 6 किलो अंमली पदार्थ घेवून गोव्याला निघाला होता. पोलिसांना माहिती मिळताच त्याच्याकडून 6 किलो अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती भोर उपविभागाचे एसडीपीओ धनंजय पाटील यांनी दिली होती.

पुण्यातून गोव्याला जाणाऱ्या बसमधून 3 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

मुंबई-गोवा आंतरराज्य मार्गावरील एका आरामदायी बसची 8 ऑक्टोबर रोजी राजगड पोलिसांनी खेड-शिवापुरी टोल नाक्यावर थांबवून झडती घेतली होती. याच बसमधून संशयीत धुनिया प्रवास करत होता. झडतीवेळी धुनियाकडे तब्बल 6 किलोचे अंमली पदार्थ सापडले होते. या अंमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमीतकमी 3 कोटी रुपये आणि भारतीय बाजारपेठेत 33 लाख रुपये असल्याची महितीही पोलिसांनी दिली होती. हा व्यक्ती हणजूण येथून पसार झाला होता.

राजगड पोलिसांनी चौकशी केली असता ‘गोव्यातील हणजूण येथील स्टार्को जंक्शनवर एका व्यक्तीला हा अंमली पदार्थ विकण्यासाठी नेण्यात येत होता’, अशी कबुली संशयीत धुनियाने दिली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी या अंमली पदार्थाचे सेलिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे राजगड पोलीस सोमवार, 11 ऑक्टोबरला धुनियाला घेऊन एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्याच ठिकाणी पुणे पोलीस खरेदीदाराला अटक करणार होते. पण, सोमवारी रात्रीच संशयिताने अतिशय चलाखीने पुणे पोलिसांना चकमा देत पळ काढला. यामुळे राजगड पोलिसांची योजना धुळीस मिळाली. मात्र त्यांनी लगेच या घटनेची माहिती गोवा पोलिसांना दिली होती.

गोवा पोलिसांची कामगिरी

गोवा पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर संशयित धुनिया माशेल येथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी माशेल येथे गोवा पोलिसांनी छापा टाकला असता धुनिया एका उसाच्या गाळ्यावर आढळला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि गुरुवारी रात्रीच राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले.

संशयित मुस्ताकी रझाक धुनिया
पुण्यातून गोव्याला जाणाऱ्या बसमधून 3 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

जामिनावर सुटून पुन्हा गुन्हा!

संशयित मुस्ताकी रझाक धुनियाला गोवा पोलिसांनी यापूर्वीही अटक केली होती. त्याच्यावर अंमली पदार्थ व आणखी एक अशा दोन गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची या गुन्ह्यातून जामिनावर सुटका करण्यासाठी माशेल येथील एक महिला हमीदार म्हणून राहिली होती. हणजूणमधून पळ काढल्यानंतर धुनियाने याच महिलेकडे आसरा घेतला असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com