Sindhudurg News: सिंधुदुर्गात सोन्याच्या खाणी? 'या' भागात सर्व्हे करण्याचा खनिकर्म खात्याचा आदेश

रेडी, साटेली , तिरोडा, डेगवे, कळणे या भागातील मातीत सोने आहे का ते पाहण्यासाठी सर्व्हे होणार
Mines
MinesDainik Gomantak

Sindhudurg News सिंधुदुर्गात सोन्याच्या खाणींचा शोध घेण्याचे महाराष्ट्राच्या खनिकर्म खात्याने आदेश दिले आहेत. रेडी, साटेली , तिरोडा, डेगवे, व कळणे या भागातील मातीत सोने आहे का ते पाहण्यासाठी सर्व्हे होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गच्या सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील आजगांव, मळेवाड, धाकोरे, सोन्सुरे, आरवली, सखैलेखोल या भागात मायानींगचे वारे सुरु झाले होते. मात्र इथली जनता ही शेती, बागायतींवर आपली उपजीविका करत असल्याने स्थानिकांनी या मायनिग प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता.

इथल्या स्थानिकांच्या आंबा, काजू, कोकम, सुरंग, केळीच्या बागा असून भातशेती हा इथल्या स्थानिकांचा उपजीविकेचा आधार आहे. तसेच या परिसरात नैसर्गिक साधनसामुग्री विपुल प्रमाणात आहे. बहुतांश भागात हिरवीगार वनराई आहे. नैसर्गिक जलस्रोत आहेत. अनेक शाळा, धार्मिक मंदिरेही आहेत. अशा परिस्थिती जर मायनिंग झाले तर या सगळ्याचा विनाश होणार असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत ठराव करून मायनिंगला जोरदार विरोध केला होता.

Mines
Devisingh Shekhawat: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन

आता पुन्हा लगतच्या रेडी, साटेली, तिरोडा, डेगवे, कळणे या भागात खनिकर्म खात्याने सोन्याच्या खाणींचा शोध घेण्यासाठी सर्व्हे करण्याचे ठरवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com