कोरोनाच्या हाहाकारात मुंबईतून आली गुड न्यूज

दैनिक गोमंतक
सोमवार, 26 एप्रिल 2021

कोरोनामुळे महाराष्ट्रासह भारतातील काही राज्यात कहर सुरू आहे.

मुंबई: कोरोनामुळे महाराष्ट्रासह भारतातील काही राज्यात कहर सुरू आहे. कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रात लॉकडाउनसारखे कठोर नियम लागू आहेत. त्याचा परिणाम मुंबईत स्पष्ट दिसतो आहे. मुंबईत कोरोनाचा वेग आता कमी होत चालला आहे. गेल्या दोन दिवसांत म्हणजेच शनिवरी आणि रविवारी मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे. रविवारी मुंबईत कोरोनाचे 5 हजार 542 नवीन रुग्ण आढळले. तर 64 लोकांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला. या नव्या रुग्णांनामुळे मुंबईत सक्रिय रूग्णांची संख्या 75 हजार 740 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रविवारी मुंबईत कोरोनाचे 8 हजार 400 हून अधिक लोक बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांनापेक्षा जास्त आहे. (Good news came from Mumbai in the wake of Corona)

गोव्यात आता वर्केशन; कामाबरोबरच एंजाॅयमेंटही!

आतापर्यंतच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुंबईतील 5 लाख 37 हजार 711 लोकांनी विजय मिळविला आहे. मुंबईत  कोरोनामुळे 12 हजार 783 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी शनिवारी कोरोनाचे 5 हजार 888 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नवीन कोरोना प्रकरणे कमी झाल्याबाद्दल ट्विट केले. 

महाराष्ट्रहा कोरोना रुग्ण आढळण्यात देशात अव्वल आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहेत. अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करायचे आवाहन दिले आहे. 1 मे पासून देशात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण सुरु होणार आहे. त्यामुळे देशा बरोबरच महाराष्ट्रात रुग्ण संख्या कमी होईल अशी आशा आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबई कोरोनाची हॉटस्पॉट ठरली होता. पण नंतर मुंबईने कोरोनावरती जवळ जवळ मात केली होती. अशा परिस्थितीत मुंबईतील आकडेवारी दिलासादायक आहे.   

संबंधित बातम्या