कोकणवासींयासाठी आनंदाची बातमी; मुंबईसाठी धावणार एसटी!

कोकणवासींयासाठी आनंदाची बातमी; मुंबईसाठी धावणार एसटी!
Good news for the people of Konkan ST to run for Mumbai

राज्यात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना दापोली (Dapoli) आगारातून सुटणाऱ्या बसेस सेवा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आजपासून तालुकांतर्गत एसटी बससेवा (ST Buses) सुरु करण्यात आली असून मंगळवारपासून मुंबई (Mumbai) मार्गावरील बसेस सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दापोली आगाराच्या व्यवस्थापक रेश्मा मधाळे (Reshma Madhale) यांनी दिली आहे. दापोली बसस्थानकातून सकाळी 7.30 ते 9.15 वाजता दापोली बुुरोंडी मार्गे कोळथरे आणि परत, सकाळी 8 वाजता दापोली दाभोळ, 9.15 वाजता दाभोळ दापोली, 12.30 दापोली-दाभोळ उंबर्लेमार्गे सुटणार आहे. दुपारी 1.45 वाजता दापोली-दाभोळ-कोळथरे-बुरोडीमार्गे परत येणार. दुपारी 12.30 वाजता दाभोळ-बुरोंडी कोळथरेमार्गे दाभोळ ही बस दुपारी 2.15 वाजता दाभोळ-उंबर्लेमार्गे परत दापोलीला येणार. सकाळी 7.00, 9.00, दुपारी 3.30 वाजता दापोली-पाजपंढरी, तर दुपारी 1 वाजता दापोली-हर्णे मार्गे बस सुटणार आहे. (Good news for the people of Konkan ST to run for Mumbai)

येत्या 25  मे पासून मुंबई मार्गावर शिवशाही बससेवा सुरु करण्यात येणार असून सकाळी 9.30 वाजता दापोली-नालासोपारा सुटेल, तर नालासोपारा येथून सकाळी 8.30 वाजता दापोलीसाठी निघणार आहे. रात्री 10 वाजता दापोली-बोरिवली, हीच बस बोरिवली मधून दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता दापोलीसाठी निघणार. सकाळी 7.45 वाजता दापोली-पुणे-चिंचवड ही बस सुटेल. परतीच्या प्रवासासाठी दुसऱ्या दिवशी तिच बस चिंचवडमधून दापोलीसाठी सुटणार असल्याची माहिती दापोली आगार व्यवस्थापक मधाळे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com