मत्‍स्‍यगंधा रेल्वेतून 10.60 लाखांचा मुद्देमाल लंपास

मत्‍स्‍यगंधा रेल्वेतून (Matsyagandha Express) ठाण्याहून उडपीला जाणाऱ्या एका महिलेची बॅग लंपास
मत्‍स्‍यगंधा रेल्वेतून 10.60 लाखांचा मुद्देमाल लंपास
Matsyagandha ExpressDainik Gomantak

मत्‍स्‍यगंधा रेल्वेतून (Matsyagandha Express) ठाण्याहून उडपीला जाणाऱ्या एका महिलेची बॅग लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी 2.15 वाजता घडली. अज्ञात चोराने सोन्याचे दागिने, रोकड व इतर मुद्देमाल मिळून सुमारे 10 लाख 60 हजार रुपयांची चोरी केल्याप्रकरणी कोकण रेल्वे (Konkan Railway) पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (Goods worth Rs 10.60 lakh stolen from Matsyagandha Express)

कोकण रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे-महाराष्ट्र येथील उमेश शेट्टी व वासंती शेट्टी उडपी येथे आपल्या मूळ गावी नातेवाईकांच्या घरी मत्‍स्‍यगंधा रेल्वेतून जात असताना, थिवी रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यावर अज्ञात चोरट्याने महिलेची बॅग लंपास केली. या बॅगमध्ये 130 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, 60 हजार रुपये रोकड, दोन मोबाईल, पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड व इतर साहित्‍य होते.

Matsyagandha Express
रेल्वेच्या मदतीला आली लालपरी

संबंधित महिलेने कोकण रेल्वे पोलिस ठाण्यात येऊन तक्रार नोंद केल्यावर ही घटना उघडकीस आली. महिलेने ते दागिने दुरुस्ती करण्यासाठी आपल्यासोबत नेले होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भा. दं. सं.च्या 379 कलमांन्‍वये गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे निरीक्षक हिरू कवळेकर तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com