महाराष्ट्र सरकारने 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवलेल्या लॉकडाउन नियमांची नविन यादी

दैनिक गोमन्तक
बुधवार, 30 डिसेंबर 2020

महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाउन  वाढवले आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली नियमांची यादी.

महाराष्ट्र शासनाने नवीन वर्षासंदर्भात जारी केलेले नियम

  • कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, लोकांना नवीन घरी बसून नविन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन केले आहे, शक्य असल्यास आपले घर सोडू नका आणि आपल्या घरातच  थांबून नवीन वर्षाचे साधेपणाने स्वागत करा.

 

  • 31 डिसेंबर रोजी नागरी समुद्रकिनारे, गार्डन्स, विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी तसेच सार्वजनिक ठिकाणी जमाव टाळा.

 

  • सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतरांचे नियम पाळा तसेच मास्क आणि सॅनिटायझर्सचा वापर करा.

 

  • विशेषत: 60 वर्ष वयाचे वृद्ध व्यक्ती  आणि 10 वर्षाच्या मुलांनी घराबाहेर जाणे टाळले पाहिजे.

 

  • 31 डिसेंबर रोजी कोणतेही धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नका.

 

महाराष्ट्र सरकारने 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले लॉकडाउन नविन नियमांची यादी जाहीर -

 

  • नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. या वर्षी करणे टाळा. नवीन वर्षात फटाके फेकू नका. काटेकोरपणे नियमांचे अनुसरण करा.

 

  • नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिस कडक कारवाई करतील.

‘दिल्लीमध्ये बसून शेती करता येणार नाही,’ माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांचा मोदी सरकारला टोला -

 

  • कर्फ्यू रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत सुरू राहील.

 

  • नवीन वर्षाच्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब खुला ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. रात्री 11 नंतर हॉटेल, रेस्टॉरंट्स इत्यादी नियमांवर नजर ठेवू ते खुले आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

 

 

 

 

संबंधित बातम्या