दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ काढणार टपाल तिकीट

लता मंगेशकर यांच्या चाहत्यांनी आणि संगीतप्रेमींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले
Lata Mangeshkar
Lata MangeshkarDainik Gomantak

ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी दीर्घ उपचारानंतर निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.गानकोकीळेच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा (National mourning) जाहीर केला आहे . खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुंबईत जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींशिवाय देश-विदेशातील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित दिवंगत गायिकेच्या स्मरणार्थ आता केंद्र सरकार टपाल तिकीट काढणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे.

त्यांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'देशाने आपला आवाज गमावला आहे. लता मंगेशकर या देशासाठी एखाद्या वारशापेक्षा कमी नव्हत्या.' 2001 मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला. तर दुसरीकडे लता मंगेशकर यांच्या चाहत्यांनी आणि संगीतप्रेमींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच ठिकाणी दिवंगत लतादीदींचे स्मारक करण्यात यावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Lata Mangeshkar
कोण कोणाचे सांत्वन करणार? आईचा आशीर्वाद हरपला...

शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आहे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्मारक शिवाजी पार्कमध्ये आहे. लतादीदी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरचे दुसरे व्यक्तिमत्व आहेत, ज्यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर लतादीदींचा अंत्यसंस्कार झाला आहे.

Lata Mangeshkar
एअर इंडियाच्या महिला वैमानिकाचा मृत्यू! बाथरुममध्ये आढळला मृतदेह

लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला कोरोनामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या 28 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्या. त्यांनी कोरोना आणि न्यूमोनियावर मात केली होती. मात्र शरीराचे अनेक भाग खराब झाल्याने अखेर 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.12 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईतील शिवाजी पार्कवर राजकीय, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com