Konkan Expressway: मुंबई-सिंधुदुर्ग आता 3 तासात

70,000 कोटी रुपयांच्या कोकण एक्सप्रेसवेसाठी (Konkan Expressway) महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील
Expressway (Konkan Expressway)
Expressway (Konkan Expressway)Dainik Gomantak

Konkan Expressway: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Congress Leader Ashok Chavan) यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई ते सिंधुदुर्ग (Mumbai to Sindhudurg) यांना रायगड (Raigad) आणि रत्नागिरीला (Ratnagiri) जोडणारा 400 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यासाठी 70,000 कोटी (70,000 Crore) रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा मसुदा तयार केला आहे. एकदा पूर्ण झाल्यावर हा प्रकल्प मुंबई-सिंधुदुर्ग (Mumbai - Sindhudurg Project) प्रवास सध्याच्या सहा ते सात तासांच्या तुलनेत तीन तासांवर येईल.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर 6 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सरकारने राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) मागच्या वर्षी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले होते. 25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या (CM Udhav Thackrey) अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय पायाभूत सुविधा समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली.

Expressway (Konkan Expressway)
Monsoon Update: IMD कडून रत्नागिरी आणि रायगडला 'रेड अलर्ट'

ई-वेमुळे किनारपट्टी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल

ग्रीनफिल्ड कोकण एक्सप्रेस वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची किंमत 70,000 कोटी रुपये आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल 2 वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी चार वर्षे लागतील, ज्यासाठी 4000 हेक्टर जमीन जमिनीची गरज पडेल.

अधिकारी म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्गाच्या धर्तीवर ग्रीनफिल्ड कोकण एक्सप्रेसवेचे नियोजन करण्यात आले आहे जे नागपूरला मुंबईशी जोडेल. अधिकारी म्हणाले, "या प्रकल्पावर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झाली आणि प्रस्तावित करण्यात आले की हा प्रकल्प MSRDC ला द्यावा, कारण या क्षेत्रातील त्याचे कौशल्य विकसित झाले आहे."

मुंबई ही भारताची व्यावसायिक आणि आर्थिक राजधानी आहे, परंतु कोकण विभाग, मुम्बईच्या जवळ असूनही, खराब वाहतूक आणि दळणवळणाच्या नेटवर्कमुळे विकास झालेला नाहीये. "कोकणातून अनेक लोक उपजीविकेच्या शोधात मुंबईकडे येत असतात. कोकण एक्सप्रेसवे या प्रदेशाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देईल," असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com