ग्रामपंचायत निडणूक: चक्क पत्नीनेच उचलले पतीला खांद्यावर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

विजयाचा आनंद साजरा करत असतांना पाळू गावातील विजयी उमेदवारांच्या पत्नीनं आपल्या पतीच्या विजयाचा आनंद व्यक्त करत त्यांना चक्क खांद्यावर उचलून घेत गावातून फेरी मारली आहे.

पुणे: कोरोना काळात ग्रामपंचायत निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण राजकीय पटलावर या निवडणूकीच्या हालचाली मात्र सुरूच होत्या. अखेर शुक्रवारी 15 तारखेला महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. आणि 18 तारखेला काल सोमवारी निवडणूकांचे निकाल जाहीर झाले.

कोणत्या गावी कोणाची सत्ता असणार हे काल स्पष्ट झालं. निकाल लागताच खेडेगावात जल्लोशाचे वातावरण बघायला मिळाले कुठे मिरवणूका निघाल्या तर कुठे विजयोत्सवाची धूम बघायला मिळाली. पण सध्या एका वेगळ्याच विजयोत्सवाची झलक पुणे जिल्हयातील पाळू गावात बघायला मिळाली.

या फोटोने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पाळू ग्रामपंचायतीमध्ये ग्रमविकास पॅनलचा पराभव झाला असून.जामखाता देवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर विजय मिळवला आहे. या घसघशीत यशामागे त्या गावातील महिला मंडळींचा मोठा वाटा असल्याच दिसून येत आहे. याच विजयाचा आनंद साजरा करत असतांना पाळू गावातील विजयी उमेदवारांच्या पत्नीनं आपल्या पतीच्या विजयाचा आनंद व्यक्त करत त्यांना चक्क खांद्यावर उचलून घेत गावातून फेरी मारली आहे.

पाळू  गावातील ग्रमास्थ संतोष शंकर गुरव यांनी 221 मतांनी ग्रामपंचायती निवडणूकीमध्ये  विरोधी उमेदवाराचा लाजिरवाणा पराभव केला. या विजयानंतर त्यांच्या पत्नी, रेणुका यांनी आपल्या पतीला म्हणजेच संतोष शंकर गुरव यांना चक्क खांद्यांवर उचलून घेतलं आणि  गावातून फेरी मारली.

वाजत गाजत निघालेली, गुलाल उधळणारी, कार्यकर्त्यांचा जल्लोश करत  निघणारी विजयी मिरवणूक आजवर सर्वांनीच पाहिली होती आणि पाहत आहेत. पण, चक्क  पत्नीनं पतीला खांद्यावर उचलून घेत असा विजयोत्सव साजरा केल्यानं अनेकांना आश्चर्य तर वाटलच पण त्याचबरोबर गावकऱ्यांना हे वेगळं दृश्य दिसल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही बघायला मिळाला आहे.

संबंधित बातम्या