गुणरत्न सदावर्ते यांचा शरद पवारांवर घणाघात

शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील राज्य सरकार अन्यायी आहे : गुणरत्न सदावर्ते
गुणरत्न सदावर्ते यांचा शरद पवारांवर घणाघात
Gunratna Sadavarte Criticizes Sharad Pawar Dainik Gomantak

गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "राष्ट्रपती पदासाठी विशिष्ट राजकीय उंची लागते. राष्ट्रपती पदावर उंची गाठलेली माणसं होती. शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार, ते वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावं त्यांच्याकडे कुठली उंची आहे?", असे सदावर्ते म्हणाले. (Gunratna Sadavarte Criticizes Sharad Pawar)

Gunratna Sadavarte Criticizes Sharad Pawar
Maharashtra SSC Result 2022: दहावीच्या निकालात मुलींची बाजी, एकूण निकाल 96.94 टक्के

राष्ट्रवादीचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील राज्य सरकार अन्यायी आहे. राज्यात महिला, कष्टक-यांवर अत्याचार होत आहे. या सरकारला मत का देऊ नये, हे पटवून देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागरण करणार आहे,” सदावर्ते यांनी पवारांवर घणाघात केला.

सदावर्ते पुढे म्हणाले, "भारताच्या संविधानात मोठी ताकद आहे. कष्टक-यांसाठी न्यायालयात लढणे मला जास्त उपयोगी वाटते. राजकारणाला अस्पृश्य मानत नाही."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com