पालघऱचा तपास सीबीआयकडे द्या

Dainik Gomantak
शनिवार, 9 मे 2020

आतापर्यंत या प्रकरणात 119 आरोपींना अटक केली आहे. तसेच अनेक आरोपींसह सामान्य नागरिक ही भीतीपोटी जंगलात पळून गेले आहेत, त्यात काही निरपराध लोक असून काही महिलांची प्रसूती ही जंगलात झाली आहे.

कासा

पालघर जिल्ह्यामधील गडचिंचले येथे 16 तारखेला झालेल्या तिहेरी हत्याकंडाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता.9) त्या परिसराचा दौरा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत असून हा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी दरेकर यांनी केली.
काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिंचले भागाचा दौरा केला होता. दरम्यान दरेकर यांनी देखील या भागाचा दौरा करत संपूर्ण आढावा घेतला. यावेळी त्यांनी पोलिस यंत्रणांना काही सूचनादेखील दिल्या. आतापर्यंत या प्रकरणात 119 आरोपींना अटक केली आहे. तसेच अनेक आरोपींसह सामान्य नागरिक ही भीतीपोटी जंगलात पळून गेले आहेत, त्यात काही निरपराध लोक असून काही महिलांची प्रसूती ही जंगलात झाली आहे. यावेळी आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, तहसीलदार राहुल सारंग, पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी आदी उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या