'सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे' मानहानीचा दावा ठोकणार; हसन मुश्रीफ बरसले

किरीट सैमय्या यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात करत आहे.
'सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे' मानहानीचा दावा ठोकणार; हसन मुश्रीफ बरसले
Hassan MushrifDainik Gomantak

किरीट सौमय्या यांच्यांकडून माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले आहे. 127 कोटींच्या कथित घोटाळ्यांचा आरोप माझ्यावर सैमय्यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे. इलेक्शन फॉर्ममध्ये मी संपत्तीची योग्य माहिती दिली आहे. यापूर्वी माझ्यावर अनेक वेळी इन्कम टॅक्सकडून धाडी टाकण्यात आली होती, तेव्हा त्यांना काहीही मिळाले नव्हते. सौमय्या यांनी माझ्यावर आरोप करण्याआगोदर अधिकृत माहिती घ्यायला पाहिजे होती. हजारो शेतकऱ्यांनी पैसे या कारखाण्यामध्ये पैस गुंतवले आहेत. सौमय्यांच्या कथित आरोपांचा मी तीव्र निषेध करतो. कारखान्याची आम्ही कायदेशीररित्या कर्जपरतफेड केली आहे.

Hassan Mushrif
हसन मुश्रीफ आणि परीवाराचा 127 कोटींचा घोटाळा; किरीट सौमय्यांचा आरोप

'दरेकरांनी संयम पाळावा' हसन मुश्रीफांची प्रवीण दरेकरांना चपराक

दरम्यान, माझ्यावर सोमय्यांच्या आरोपांचा काही परिणाम होणार नाही. त्याचबरोबर चंद्रकांत पाटलांकडेही काहीच बोलण्यासारखं नाही. तसेच सौमय्यांनी हवं तिकडं जावं मला काहीही फरक पडत नाही. मी सौमय्यांच्या विरोधात 100 कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना फक्त बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. किरीट सौमय्यांना काहीही माहिती नाही. आम्ही कारखान्यांसंबंधी सगळी माहिती दिली आहे. तसेच ही माहिती न्यायप्रविष्ठही आहे. कोल्हापुरामध्ये भाजपचा सुपडासाप झाला आहे. प्रविण दरेकरांनी संयम पाळावा. चंद्रकांत पाटलांना केंद्रीय मंत्री अमित शहांच्या कृपेने पद मिळाले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com