कोरोनाचा कहर: महाराष्ट्रात दिवसभरात 47,288 कोरोनाबाधित वाढले; 155 जणांचा मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

राज्यात आज दिवसभरात एकूण 4,51,375 एवढे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई: देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्याप्रमाणात नवे कोरोनाबाधित आढळून येत असून रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यशासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्यासंख्येने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात 47,288 कोरोनाबाधित वाढले असून 155 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर 1.83 टक्के एवढा आहे. राज्यात आज दिवसभरात एकूण 4,51,375 एवढे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. (Havoc of corona 47288 corona outbreaks in Maharashtra during the day 155 people died)

दरम्यान आज 26,252 कोरोनाबाधित रुग्ण ठीक झाले आहेत. राज्यात आयपर्यंत एकूण 25,49,075 एवढे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.36 एवढे झाले आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,07,15,793 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 30,57,885 नुमेने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यामध्ये सध्या 24,16,981 व्यक्ती होमक्वॉरंटाइन आहेत. तर 20,115 संस्थात्मक क्वॉरंटाइन आहेत.

Maharashtra Corona Update: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रात्री कडक...

राज्यामधील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्याप्रमाणावर तरुण वर्गाला बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वय़ोगटाला देखील कोरोनाच्या विषाणूपासून वाचवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी. अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

संबंधित बातम्या