मराठा आरक्षण : आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; स्थगिती उठणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

राज्याच्या दृष्टीने मराठा आरक्षणाचा मुद्दा हा संवोदनशील असल्याने ही सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी 20 जानेवारीला होणार होती, परंतु 20 जानेवारील सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीला स्थगिती दिली होती. आता या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल. यामध्ये न्यायमूर्ती रवींद्र भट, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.

'जनतेनं लोकशाहीविरोधी वागणाऱ्यांना धडा शिकवला’

राज्याच्या दृष्टीने मराठा आरक्षणाचा मुद्दा हा संवोदनशील असल्याने ही सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मराठा आरक्षणावरची ही सुनावणी आज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम राहणार, की उठणार यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. देशभरातील आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी व्हावी, या मागणीसाठी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र लिहणार असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती.

नाना पटोले यांनी दिला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षदाचा राजीनामा 

मराठा आरक्षणाबाबत दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान कायदेतज्ज्ञांशी झालेल्या चर्चेतून ही सूचना पुढे आली होती. 25 जानेवारीपासून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू होणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयात 5 दिवस आधीच म्हणजे 20 जानेवारीला मराठा आरक्षणावर सुनावणी होणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु, न्यायालयाने 20 जानेवारीला सुनावणीला स्थगिती दिली असून, आता या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या