सिंधुदुर्गात पुन्हा दमदार पाऊस

rain
rain

सावंतवाडी

जिल्ह्यात पुन्हा एकदा वादळी पावसाचा तडाखा बसला. जिल्ह्याच्या बऱ्याच भागात पावसाने झोड उठवली. यामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे सुरू असतानाच पुन्हा पावसाने दाणादाण उडवली. सावंतवाडी, वेंगुर्ले, बांदा व आंबोली परिसरात मुसळधार तर अन्य तालुक्‍यात हलक्‍या व मध्यम स्वरूपाचा सरी कोसळल्या. ओटवणे दशक्रोशीतील गावामध्ये वादळी वाऱ्याचा पावसामुळे नुकसान झाले. इतर ठिकाणी नुकसान झाले नसले तरी वाहतूक व जनजीवन मात्र प्रभावित झाले. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
गेल्या काही दिवसात वळीव कोसळत आहे. दिवसभर उकाडा जाणवत असताना पुन्हा एकदा ढगांच्या गडगटासह पाऊस कोसळल्याने जनजीवन प्रभावित झाले; मात्र पावसामुळे विजेचा लपंडाव दिसून आला. सावंतवाडी तालुक्‍यातील सायंकाळी बत्ती गुल झाली होती.
जिल्ह्यात मंगळवारी कोसळलेल्या पावसाने दोडामार्ग, सावंतवाडी शहर व ग्रामीण, कुडाळ, माणगाव या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यावेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे सद्यस्थितीत सुरू आहेत. पडवी, मांगर व घराचे नुकसान झाल्याने त्याची दुरुस्ती व डागडुजी सुरू होती. शेती, बागायती, केळी नुकसान झाले होते. झाडे कोसळली होती, वीज वाहिन्या तुटल्या होत्या.
ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुन्हा एकदा वळवाने जोरदार हजेरी लावली. देवगड, मालवणला आकाश निरभ्र राहिले तर कणकवली, कुडाळ व वैभववाडीमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाच्या सरी नव्हत्या; मात्र गतवेळेसारखा जिल्ह्यात सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्‍यात ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. येथील तालुक्‍यातील आंबोली, बांदा परिसरात वादळी वाऱ्याने झोडपले. ओटवणे दशक्रोशीतील काही गावांमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. काही ठिकाणी घराचे पत्रे उडून गेले. या भागात मोठे नुकसान झाले. वेंगुर्ले शहर परिसर येथे कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गोवा सीमेवरील सातार्डा, आरोंदा पंचक्रोशीतील गावांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com