Corona Update : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच; मागील 24 तासात आढळले सर्वाधिक रुग्ण 

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 25 मार्च 2021

चीनच्या वुहान शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वात पहिल्यांदा सापडल्याचे समोर आले होते. त्यानंतर मात्र या विषाणूने संपूर्ण जगभरात अक्षरशः थैमान घातले.

चीनच्या वुहान शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वात पहिल्यांदा सापडल्याचे समोर आले होते. त्यानंतर मात्र या विषाणूने संपूर्ण जगभरात अक्षरशः थैमान घातले. भारतात देखील मागील वर्षाच्या जानेवारी महिन्यात कोरोनाने प्रवेश करत धुमाकूळ घातला होता. व देशात मध्यंतरी कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून, देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ लागल्याचे दिसत आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. (The highest number of new cases of corona have been found in Maharashtra in the last 24 hours) 

देशातील महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यात  कोरोना बाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि खासकरून महाराष्ट्रातील आणि केरळ मधील परिस्थिती तर फारच गंभीर होत चालली आहे. महाराष्ट्रात मागील काही चोवीस तासांमध्ये कोरोनाचे नवीन 35,952 रुग्ण आढळले आहेत. तर 111 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती मिळाली आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील उपचार घेत असलेल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2,62,685 इतकी झाली आहे. 

''आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आले''

मागील काही दिवसांपासून देशातील एकट्या महाराष्ट्रात कोरोनाची नवी प्रकरणे सापडत आहेत. महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai) महानगरात कोरोनाची नवी 5,504 प्रकरणे समोर आली आहेत. तर मुंबईत 14 जणांना मागील 24 तासात आपला गमवावा लागला आहे. बुधवारी मुंबईत सर्वाधिक 5,185 कोरोनाची नवी प्रकरणे आढळून आली होती. 

दरम्यान, महाराष्ट्रातील (Maharashtra) एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 26,00,833 वर पोहचली आहे. आणि आतापर्यंत 53,795 जणांचा कोरोनामुळे जीव गेलेला आहे. यानंतर 22,83,037 जण कोरोनाच्या विळख्यातून सहीसलामत बाहेर पडले आहेत. 

 

   

संबंधित बातम्या