महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांत होम आयसोलेशनला बंदी; मुंबईत मात्र दिली परवानगी

महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांत होम आयसोलेशनला बंदी; मुंबईत मात्र दिली परवानगी
Home isolation

मुंबई: महाराष्ट्र सरकारने(Government of Maharashtra) कोरोनासंदर्भात(Covid-19) नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. नव्या नियमांनुसार आता कोविड रूग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच रहावे लागेल, म्हणजेच आता नवीन रूग्णांसाठी घरगुती आयसोलेशन(Home isolation) सुविधा बंदकरण्यात आले आहे. घरगुती विलगीकरणामध्ये राहणा-या रुग्णांमुळे कोरोना बर्‍याच ठिकाणी पसरत असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला. (Home isolation banned in 18 districts of Maharashtra but Permission granted in Mumbai)

हा नियम महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांत लागू करण्यात आला आहे जेथे कोरोना रूग्णसंख्येचा सकारात्मकता दर 10 टक्के किंवा त्याहून अधिक आहे त्या 18 जिल्ह्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबादचा समावेश आहे. 

मात्र, बीएमसीने अजूनही आयसोलेशनला परवानगी दिली आहे. BMC ने अजून तरी होम क्वारंटाइनवर बंदी घातली नाहीये. सौम्य लक्षणं असलेल्यांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिला जातोय. फक्त जे होम क्वारंटाइन होतायत त्यांच्यावर BMC ची नजर आहे. त्यांच्या आरोग्याची सातत्याने विचारपूस केली जात आहे. होम क्वारंटाइन कॅन्सल केलेल्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट 10 पेक्षा जास्त आहे. मुंबइचा अंदाजे रेट 0.030 टक्के आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने सांगितले की, कोरोनाची प्रकरणे आता कमी होत असली तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. बर्‍याच वेळा अशा तक्रारी आल्या होत्या की होम आयसोलोशनचे योग्यरित्या पालन केले जात नाही, ज्यामुळे रुग्ण तसेच घराच्या इतर लोकांना कोरोनाची लागण झाली.

घरातील आणि शेजारील उर्वरित लोकांचा बचाव करण्यासाठी आता कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने आता स्पष्ट केले आहे की, सर्व वयोगटातील लोकांसाठी होम आयसोलोशनची सुविधा बंद केली गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की जे लोकं पहिल्यांदा होम आयसोलोशनमध्ये आहेत, त्यांनी या नियमांना फॉलो करायची गरज नाही, परंतु आता कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये राहावे लागेल. महाराष्ट्रातील कोरोनाचा आलेख सातत्याने खाली येत आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com