6 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोकण दौऱ्यावर

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 6 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर येणार आहेत.  

ओरोस :  नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये कोकणात भाजपने चांगली कामगिरी करत शिवसेनेला दणका दिला. खासदार नारायण राणे यांच्यामुळे हे शक्य झाल्याने, भारतीय जनता पक्षाचा नारायण राणेंवरील विश्वास दृढ झाल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 6 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर येणार आहेत.  

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: कर्नाटकातील कन्नड संघटना अस्वस्थ; गुलबर्गा-सोलापूर...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या 150 विद्यार्थी क्षमता असलेल्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यासाठी 6 फेब्रुवारीला रोजी दुपारी १ वाजून ५० मिनिटानी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे येणार आहेत. या कार्यक्रमाला अमित शहा यांच्याबरोबरच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते विनोद तावडे उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी शनिवारी  घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

14 फेब्रुवारी पासून मुबंई अहमदाबाद मार्गावर धावणार तेजस एक्सप्रेस 

पडवे येथील एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, कुडाळचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक राकेश कांदे, संतोष वालावलकर आदी  उपस्थित होते. 'मेडिकल कॉलेजला 150 विद्यार्थी प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. प्रवेश घेण्याची मुदत 15 जानेवारी रोजी संपली असून, प्रवेश पहिल्याच फेरीतच पूर्ण झाले आहेत. परवानगीअभीवी 225 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारावा लागला, अशी महिती खासदार नारायण राणे यांनी दिली.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याबद्दल सांगतना नारायण राणे म्हणाले, “6 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी अमित शहा मेडिकल कॉलेज येथे येणार आहेत. 2 वाजून 20 मिनिटांनी मेडिकल कॉलेजचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अमित शहा उद्घटनस्थळी 1 तास थांबतील. कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील भाजप नेत्यांकडून केंद्रीय मंत्री अमित शहांचे स्वागत केले जाईल. हा कार्यक्रम संपल्यावर ते हेलिकॉप्टरने गोव्याला रवाना होणार आहेत.

संबंधित बातम्या