गोवेकरांनो तुम्हाला माहितीये का कोकणातला गरम पाण्याचा झरा?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

भूकंपाच्या धक्याविषयी काही पूर्वसूचना मिळवण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले आहे. या संशोधनाअंतर्गत केलेल्या खोदाईतून (ड्रिलिंग) गरम पाण्याचा स्रोत संशोधकांच्या निदर्शनास आला आहे.

रत्नागिरी : भूकंपाच्या धक्याविषयी काही पूर्वसूचना मिळवण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले आहे. या संशोधनाअंतर्गत केलेल्या खोदाईतून (ड्रिलिंग) गरम पाण्याचा स्रोत संशोधकांच्या निदर्शनास आला आहे.  मात्र, तेथे चाचण्या वा माहिती मिळवणे सध्या शक्‍य नाही; मात्र असे असले तरी गेल्या सहा वर्षासापून  एकाच तापमानावर तेथून गरम पाणी वाहात आहे. संगमेश्‍वर तालूक्यातील खडीकोळवण गावातील जिल्हा परिषद शाळेशेजारी हे बोअर करण्यात आले आहे. उष्णतेचा हा प्रचंड मोठा स्रोत आर्थिक ऊर्जेमध्ये रूपांतरित करता येईल का, यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

भूकंपाषशास्त्राचा अभ्यास करण्याकरीता 2014 साली भूकंपमापन ड्रिलिंग करण्यात आले.  जमिनीखाली भूकंपमापन यंत्र बसवण्याची योजना आखण्यात आली होती. या गावात ड्रिलिंग केल्यानंतर 1045 मीटर खोल जमीनात गरम पाण्याचे झरे लागले. त्यानंतर 1200 मीटर खोलवर खोदाई करण्यात आली. त्या खोदाईमध्ये कॅमेरे सोडून भूगर्भातील हालचालीही नोंदवायच्या होत्या. परंतु पाण्याच्या उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने ते साध्य झाले नाही.

सारख्या दाबामुळे 2014 पासून तेथे गरम पाणी वाहात आहे. मात्र, त्याचा शेतीसाठी उपयोग करता येत नाही. या पाण्यावर भाजीलागवड करण्याचा प्रयत्न यशस्वी होवू शकला नाही. या पाण्यात गंधकाचे प्रमाण जास्त आहे. शिवाय पाण्याचे तापमान झाडांना सोसणारे नाही. मात्र खडीकोळवणमधील गांगेश्‍वर मंदिर आणि परिसर पर्यटकांसाठी पर्यटनाचे ठिकाण होवू शकते. गावच्या सरपंचांनी यासाठी प्रयत्न सुरू केले असून विविध खात्यांकडे पर्यटनासाठी हा परिसर विकसित करता येईल म्हणून विनंती अर्ज ही सादर केले आहे.

सह्याद्रीचा निसर्गरम्य आणि पर्यटनासाठी अनुकूल असा हा प्रदेश आहे आणि त्याचे "क' वर्ग पर्यटनस्थळ करावे, अशी मागणी गावकरी आणि प्रभारी सरपंच संतोष घोलम यांनी सर्व सरकारी खात्यांकडे केली आहे. 

सह्याद्रीतील नव्या वनस्पतीला शरद पवार यांचे नाव! 

 

संबंधित बातम्या