शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याजवळील 21 मजली इमारतीला भीषण आग

अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि सात जंबो टँकर घटनास्थळी हजर होते.
शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याजवळील 21 मजली इमारतीला भीषण आग
huge fire broke out in a 21-storey building near Shah Rukh Khan's 'Mannat' bungalowDainik Gomantak

मुंबई: मुंबईतील वांद्रे बँडस्टँड परिसरात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्याजवळ असलेल्या 21 मजली निवासी इमारतीला सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली. अग्निशमन विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

(huge fire broke out in a 21-storey building near Shah Rukh Khan's Mannat bungalow)

huge fire broke out in a 21-storey building near Shah Rukh Khan's 'Mannat' bungalow
कतरिना अन् विकी न्यूयॉर्कच्या गल्लीबोळांचा घेताहेत आनंद

या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आग 21 मजली इमारतीच्या 14 व्या मजल्यावर लागली. हे 'लेव्हल-टू' फायर म्हणून वर्गीकृत आहे.

अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग 21 मजली इमारतीच्या 14व्या मजल्यावर लागली. हे 'लेव्हल-टू' फायर म्हणून वर्गीकृत आहे. अग्निशमन दलाला संध्याकाळी 7.45 च्या सुमारास याची माहिती मिळाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या, सात जंबो टँकर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), अदानी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.