महाराष्ट्राला पुन्हा कोरोनाचा विळखा; या नेत्यांना झाली दुसऱ्यांदा लागण

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

कोरोनाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध शहरांध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध शहरांध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मुंबई आणि नागपुरात पुन्हा परिस्थिती बिकट होत चालली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यापैकी काही नेते असे आहेत, जे दुसऱ्यांदा कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. या नेत्यांमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, जयंत पाटील, रक्षा खडसे, एकनाथ खडसे, बच्चू कडू, राजेंद्र शिंगणे यांचा समावेश आहे.

मोठी बातमी : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन; तर अन्य ठिकाणी निर्बंध लागू

महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाची 4787 नवीन प्रकरणं समोर आल्यामुळे दहशत पसरली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काल एका दिवसात कोरोनाच्या सर्वाधिक रूग्णांची नोंद झाली आहे. मंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी ट्विट करून त्यांना पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी ज्या लोकांनी त्याच्याशी संपर्क साधला आहे त्यांना चाचणी करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

ट्विट प्रकरण : शूटिंग बंद पाडू; अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांना काँग्रेसचा इशारा

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु, जे त्यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांना चाचणी करून घेण्याचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातही गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 5427 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 51669 लोकांचा मृत्यू झाला आहे.
 

संबंधित बातम्या