" शरद पवारांनी मला धमकावणं थांबवून समोर येऊन लढावं "

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप समोर आल्यानंतर मला वेगवेगळ्या लोकांकडून धमकीचे फोन येत आहेत आणि पोलिसांना ते माहितही आहे.असा घणाघात भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.

मुंबई - धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप समोर आल्यानंतर मला वेगवेगळ्या लोकांकडून धमकीचे फोन येत आहेत आणि पोलिसांना ते माहितही आहे. शरद पवारांनी हे थांबवावं आहे आणि त्यांच्यात हिम्मत असेल तर समोर येऊन लढा, असा घणाघात भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले हाते. त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. सरकारवर टिका करणाऱ्या विरोधकांमध्ये किरीट सोमय्या कायमच आघाडीवर राहिले आहेत.

संबंधित बातम्या