Maharashtra: 'हिंमत असेल तर सरकारने निवडणुका घेऊन दाखवाव्यात'- उद्धव ठाकरे

Maharashtra: सध्या देशात राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोदीसुद्धा पक्षात संपतील असेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेDainik Gomantak

Maharashtra: महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने बदल होताना दिसत आहेत.काही दिवसांपुर्वीच शिवसेनेच्या गटात फुट पडली होती, त्यानंतर मोठा गदारोळ माजलेला दिसून येतहोता. या फुटीमुळे सत्तेतही मोठा बदल झाल्याचे दिसून आले होते.

आता शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्याने पुन्हा मोठे बदल होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र शिवसेना किंवा वंचित बहुजन आघाडीने यावर शिक्कामोर्तब केले नव्हते. आज दोन्ही पक्षप्रमुखांनी एकत्र येत युती झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

त्याचबरोबर पत्रकारपरिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी असेही स्पष्ट केले आहे की, आमची युती शिवसेनेशी आहे महाविकास आघाडीबरोबर नाही. पुढे त्यांनी असे म्हटले आहे की पवारांबरोबर माझं शेतातलं भांडण नाही मुद्द्यांवर भांडण आहे. शिवसेनेबरोबरची युती राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस स्विकारतील अशी मी अपेक्षा करतो. सध्या देशात राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोदी( Modi )सुद्धा पक्षात संपतील असेही त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, उद्धव ठाकरेंनी सरकारला हिंमत असेल तर निवडणुका घ्या असे आव्हान त्यांनी सरकारला दिले आहे. सरकारवर आरोप करताना म्हटले आहे की, न्यायव्यवस्थेला दमदाटी करण्याचे प्रकार सुरु आहेत. देशाचे हित प्रथम आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Pathan Controvery : 'पठाण'चं चित्रपटगृहावरचं पोस्टर फाडलं, पुण्यात बजरंग दल आक्रमक...

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस( Congress ) यांच्याशी या युतीबाबत चर्चा केली आहे आणि त्यांनाही ही युती मान्य आहे. नया रास्ता ,नया रिश्ता या तत्वांवर पुढे जाऊ असे म्हटले आहे. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येऊन देशहितासाठी प्रयत्न करणार आहे असे या नवीन युतीकडून सांगण्यात आले आहे. या युतीनंतर महाराष्ट्रा( Maharashtra )चे राजकारण कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com