सिंधुदुर्गातून गोव्यात जाणाऱ्यांची होणार कडक तपासणी
Sindhudurg

सिंधुदुर्गातून गोव्यात जाणाऱ्यांची होणार कडक तपासणी

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील सिंधुदुर्गातून (sindhudurg) गोव्यात (goa) जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला तो प्लन रद्द करावा लागणार आहे. सध्या पावसाळी वातावरण आबे, नदी, समुद्र, धबधब्याना उधाण आले आहे आणि कोरोनामुळे घरी बसलेल्या पर्यटकांना मात्र या पावसाळी पर्यटनाचा मोह आनावर होतोय. मात्र आता महाराष्ट्रातून गोव्यात जाणाऱ्यांची कडक तपासणी केली जाणार आहे, कारण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM pramod sawant) यांनी ही माहीती दिली आहे. सिंधुदुर्गातून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेतली जाईल, असेही ते म्हणाले.(If you are going to Goa from Sindhudurg there will be a strict investigation on goa border)

गोव्यातील काहींना डेल्टा विषाणूचा (delta plus) संसर्ग झाला होता ही गोष्ट मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. आणि महाराष्ट्रातही डेल्टा विषाणूचे २१ रूग्ण आढळले. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, कणकवली येथे एका व्यक्तीला डेल्टा प्लस या घातक विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे गोवा सरकारने त्याची गंभीर दखल आणि खबरदारी घेतली आहे. त्यामुळे गोव्याच्या सीमेवर कडक स्क्रिनिंग केले जाईल. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेतली जाईल.

या तपासणीस पुरक मदत व्हावी म्हणून खासगी प्रयोगशाळांना सीमेवर चाचणी केंद्र उघडण्यासाठी गोवा सरकार परवानगी देणार आहे. यासाठी दोन-तीन प्रयोगशाळांशी सरकारची बोलणी सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी काल पर्वरी येथे दिली. सध्या डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या कुठल्याही रुग्णाची माहिती सरकारकडे नाही. मात्र सरकार नियमितपणे 15 दिवसांनी काही नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठवते. त्यातून असा नवा विषाणू आढळला तर त्याची माहिती समोर येते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com