बॉलिवुड आणि जाहिरातींमध्ये काम करायचा विचार करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा

बॉलिवुड आणि जाहिरातींमध्ये काम करायचा विचार करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा
If you are thinking of working in Bollywood and advertising, then definitely read this news

मुंबई - मुंबई (mumbai)  हे शहर स्वप्ननगरी आहे. त्यामुळे बॉलीवुड (Bollywood) आणि जाहिरातींमध्ये (Advertising) काम मिळवण्यासाठी अनेकांची धाव ही मुंबई शहराकडे असते. या नावाखाली अनेक नागरिकांना (Citizen) कोट्यवधी रुपायांचा गंडा घालणाऱ्या अपूर्व अश्विन दौड़ा उर्फ डॉक्टर ऋषि श्रॉफ या तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. ( If you are thinking of working in Bollywood and advertising, then definitely read this news)

डॉक्टर ऋषि श्रॉफ याने आतापर्यंत अनेक नागरिकांना या थापा देऊन कोट्यावधी रुपये त्यांच्याकडून उकळल्याची माहिती पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली आहे. 
या तरुणाने नागरिकांची फसवणूक करण्यासाठी झारा किड्स आणि जारा वर्ल्ड या दोन बनावट वेबसईट्स तयार केल्या होत्या. या दोन्ही संकेतस्थळांची लिंक आणि त्याखाली आम्ही टीव्हीसाठी किंवा चित्रपटांसाठी जाहिराती कास्ट करत आहोत. आपणास इंटरेस्ट असल्यास आपले नाव, जन्मतारीख ,  व्हॉट्सऍप  क्रमांकावर पाठवावा. तुमच्या मुलाचे  2 ते 14 वर्ष या वयोगतील असतील तर कृपया तुमच्या मुलांचा फोटो आणि जन्मतारीख पाठवा, असा मॅसेज ते लिहून पाठवत असत. 

यामुळे नागरिक अशा जाहिरातींना बळी पडून त्या लिंक किंवा वेबसाइटल भेट द्यायचे. 
त्यानंतर नागरिकांनी रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबरवर फोन करून हा तरुण त्यांच्या मुलांच्या शूटसाठी कपडे घ्यायचे आहेत, शूटसाठी परवानगी घ्यायची आहे याप्रकरची 
विविध कारणे सांगून व्यक्तींकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करत होता. त्या तरुणाने अशा पद्धतीने अनेक नागरिकांची आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. 

असे करण्यासाठी त्याने बँकेची 18 खाती वापरली आहेत. तसेच मोबाइलचे लोकेशन माहिती पडू नये म्हणून त्याने 8 आयफोन 1 सॅमसंग असे 9 मोबाइलचा वापर केला आहे. त्याच्याजवळ 40 सिमकार्ड सापडले आहेत. या तरुणाने अनेक कार्यक्रमांमध्ये आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे अशी माहिती समोर आली आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेच्या कोलोरॅडो येथील टीएफटी बिझनेस स्कूलमधून झाले आहे. तसेच अनेक देशात ऑफिस भाड्याने घेऊन नागरिकांची फसवणूक करत असायचा.

अलीकडेच त्याने जो विमानाच्या सुटे  भागाचा ऑनलाइन व्यवसाय करणारे महेश गुप्ता यांची ऑनलाइन 32 हजार 69 हजार रुपयांची फसवणूक केली होती. त्याने हे उद्योग 2017 पासून सुरू केले आहे. फसवणूक केलेल्या लोकांच्या पैशातून तो मौज मजा करत होता. त्याला महागड्या गाड्यांचे आकर्षण होते, त्यामुळे तो फिरण्यासाठी मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, पोर्चे यासारख्या महागड्या लक्झरी वाहनांचा वापर करत होता. 

ही देखील पहा - 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com