बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंजला तीन चिनी कंपन्यांचा हात

telephone exchange
telephone exchange

मुंबई

गोवंडी येथील बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंज तीन चिनी कंपन्यांच्या मदतीने सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंजच्या माध्यमातून 30 लाख दूरध्वनी करण्यात आले आणि सरकारचा 20 कोटी रुपयांचा महसूल बुडवण्यात आला.
बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणात समीर अलवारी (38) याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी दहशतवाद, आर्थिक गुन्हेगारी व अन्य सर्व बाजूंनी पोलिस तपास करत आहेत. या सराईत आरोपीबाबत इतर माहिती घेण्याचे काम सुरू आहे. आरोपीबाबतची माहिती जम्मू-काश्‍मीर पोलिस व लष्करी गुप्तचर विभागाला मिळाली. तीन दिवसांपूर्वी ही माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिस आरोपीचा शोध घेत होते. एका खासगी मोबाईल नेटवर्क कंपनीच्या मदतीने तपास केला असता हे दूरध्वनी गोवंडी परिसरातून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गोवंडी येथे छापा टाकून समीर अलवारी याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 223 सिम कार्ड व पाच सिमबॉक्‍स हस्तगत करण्यात आले.
पोलिसांनी अधिक तपास केला असता, आखाती देश व पाकिस्तानमधून दूरध्वनी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. परदेशातून आलेले अथवा व्हीओआयपी (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) दूरध्वनी बेकायदा एक्‍स्चेंजच्या माध्यमातून वळवले जातात. सिम बॉक्‍स आणि इंटरनेटच्या मदतीने सर्व्हरद्वारे हे कॉल संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवले जात असल्याने नोंदही होत नव्हती. दूरध्वनी आलेल्या व्यक्तीला भारतीय मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी आला असल्याचे वाटायचे.

हेरगिरीबाबत पडताळणी
या बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंजचा वापर करून पाकिस्तानी यंत्रणांनी भारतीय लष्करी तळांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का, याबाबत तपास सुरू आहे. हेरगिरीसाठी या यंत्रणेचा वापर झाला का, याबाबत पडताळणी सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com