विधानसभा निवडणुकांमुळेच राज्यासह देशात अशांतता पसरवली जातीय: शरद पवार

त्रिपुरातील घटनेवरून महाराष्ट्रातील हिंसाचार आता तीव्र होताना दिसत आहे याबाबत बोलताना शरद पवार यांनी नाव न घेता भाजपवर टीका केली आहे
विधानसभा निवडणुकांमुळेच राज्यासह देशात अशांतता पसरवली जातीय: शरद पवार
Incidence in Tripura & Maharashtra is assembly election politics says Sharad Pawar Dainik Gomantak

त्रिपुरातील घटनेवरून (Tripura Violence) महाराष्ट्रातील (Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. त्रिपुरातील घटनेवरून महाराष्ट्रातील हिंसाचार आता तीव्र होताना दिसत आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही याबाबत वक्तव्य केले आहे. इतर राज्यातील घटनांबाबत काही संघटना येथे विनाकारण गोंधळ घालत असल्याचे असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.(Incidence in Tripura & Maharashtra is assembly election politics says Sharad Pawar)

अशा प्रवृत्तीला कितपत प्रोत्साहन द्यायचे याचा विचार जनतेने करायला हवा,असे देखील शरद पवार यांनी सांगितले आहे. इतर ठिकाणी काही झाले तर आता अमरावतीप्रमाणेच बंद पुकारण्यात आला आणि तो शांततेत झाला मात्र आता एका राजकीय पक्षाकडून जिल्हा बंद पुकारण्यात येत असल्याचे ऐकायला मिळत आहे. हे योग्य नसल्याचे देखील शरद पवारांनी सांगण्यात आले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता शरद पवार म्हणाले की, ते पक्ष त्यांची निराशा या मार्गातून बाहेर काढत आहोत. मुळात ज्या पक्षाने सरकार चालवले आहे त्यांनी अशा वेळी बंदची हाक देऊ नये कारण त्याने शांतता भंग पावते.

शरद पवार म्हणाले की, काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणे बाकी आहे. विशेषत: उत्तर प्रदेशात जे भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवेल. त्याला समोर पाहून अशा घटना घडत आहेत. त्यांनी यूपीतील लखीमपूरच्या घटनेचाही उल्लेख केला. याआधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी अमरावतीतील हिंसाचाराबद्दल भाजपचे नाव घेत दंगल घडवण्याचा मोठा कट असल्याचा आरोप केला होता.

Incidence in Tripura & Maharashtra is assembly election politics says Sharad Pawar
मोदींच्या विरोधात विरोधकांकडे सक्षम चेहरा नसल्याच्या चर्चेला पवारांकडून पूर्णविराम

अलीकडेच त्रिपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार झाल्याचा आरोप मुस्लिम संघटना करतात. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्यानंतर त्रिपुरातील वातावरण तापले होते. तेथे त्यांना धमकावले जात असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला. मशिदींचे नुकसान आणि तोडफोड झाल्याच्या बातम्याही आल्या. मात्र पोलिसांनी तपासात हे वृत्त फेटाळून लावले. पण ते तणावपूर्ण वातावरण आणि काही सोशल मीडिया पोस्टमुळे देशभरात त्रिपुरा हिंसाचाराचा निषेध झाला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com