कोरोनारुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक; महाराष्ट्रातील जनतेला आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

दैनिक गोमंतक
सोमवार, 22 मार्च 2021

आज पर्यंत 45 लाख लोकांना लसीकरण करण्यात आले आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

पुणे : कोरोनाची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांमुळे मागील वर्षाप्रमाणे परिस्थिती निर्माण होणार असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच राज्यातल्या अनेक शहरांत पुन्हा अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत, खबरदारी बाळगण्याचे आवाहन राज्यातील नागरिकांना केले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीकरणासंदर्भात राज्य सरकार करत असेलेल्या प्रयत्नांबद्दल देखील दिली. (The increase in the number of corona patients is worrisome Health Ministers appeal to the people of Maharashtra)

तब्ब्ल वर्षभराच्या प्रयत्नानंतर कोरोनाला रोखण्यात आरोग्य यंत्रणांना यश आले होते. मात्र आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्यातील नागपूर, पुणे आणि मुंबई या प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होताना दिसते आहे. याच अनुशंघाने राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा पुन्हा मिशन मोडवर येऊन कामाला लागल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील कोविड सेंटर्स मधील डॉक्टरांना पुन्हा बोलावण्यात आले असून, सर्व जम्बो सेंटर्स पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी देखील मास्क आणि इतर सुरक्षेच्या उपायांचा पूर्ण वापर करावा असे आवाहन राजेश टोपे यांनी केले. पुण्यात (Pune) पार पडलेल्या या पत्रकार परिषदेनंतर, आपण लगेचच पुण्याच्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली. 

महाराष्ट्र(Maharashtra) राज्य कोविड टेस्ट करण्यात सर्वात पुढे असून, केंद्र सरकारने एकूण टेस्ट पैकी किमान 70 टक्के आर.टी.पी.सी.आर. टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या असताना, महाराष्ट्रात आर.टी.पी.सी.आर. टेस्ट चे प्रमाण 73 टक्के एवढे आहे. तसेच लसीकरण करण्यात सुद्धा महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे सांगत, आज पर्यंत 45 लाख लोकांना लसीकरण करण्यात आले आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले. लसीकरणासाठी किमान 100 बेड्ची व्यवस्था असणाऱ्या केंद्रालाच परवानगी होती, त्यात आपण स्वास्थ्य मत्र्यांशी चर्चा करून 20 बेड्सची व्यवस्था असणाऱ्या केंद्रात सुद्धा लसीकरण करू देण्याची विनंती केली असल्याची माहिती राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी दिली. दरम्यान महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत होणारी वाढ ही चिंताजनक असली तरी, इतर राज्यांच्या तुलनेत कोविड टेस्ट, तसेच निदान झालेल्या रुग्णांची संख्या सरकारच्या पोर्टलवरती पारदर्शक पद्धतीने नोंदवली जात आहे, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

मद्यप्राशन करण्यासंदर्भात दिल्ली सरकारने जारी केली नवी नियमावली 

संबंधित बातम्या