सिंधुदुर्ग किनाऱ्यावर परराज्यातील ट्रॉलर्स यांची वाढती घुसखोरी; सिंधुदुर्गात धुमाकूळ  

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

परराज्यातून  कोणत्याही  मासेमारी  करणाऱ्या  नौकेला महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 12  मैल  आत  येवून  मासेमारी  करण्याला  बंदी  आहे.

  सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात  परराज्यातील  हायस्पीड  ट्रॉलर्सनी किनाऱ्यावर  धुमाकूळ घातला  आहे. झुंडीने  दाखल  होत  मोठ्याप्रमाणात  मासळीची  लूट  करत आहेत. समुद्रात मासेमारी  करत असणाऱ्या  सिंधुदुर्गातील स्थानिक मच्छीमारांच्या  जाळ्यांचे  जाताना  नुकसानही  करुन  जात  आहेत.

परराज्यातून  कोणत्याही  मासेमारी  करणाऱ्या  नौकेला महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 12  मैल  आत  येवून  मासेमारी  करण्याला  बंदी  आहे. मात्र अशी बंधने  झुगारत  परराज्यातील  मासेमारी  करणारे  ट्रॉर्लस  रात्रीच्या  वेळी  दिवे बंद करुन घुसखोरी करुन मासेमारी करत आहेत. दरम्यान सिंधुदुर्गातील स्थानिक  मच्छिमारांनी  मासेमारीसाठी  समुद्रात  टाकलेल्या जाळ्यावरुन हे ट्रॉलर्स  जात असल्या कारणाने  जाळी  तुटून  मोठ्या  नुकसानाला  सामोरे   जावे लागत आहे. यामुळे मच्छिमारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या  संदर्भात  महाराष्ट्राच्या  मत्स्य  विभागाने  त्वरित  कठोर  कारवाई करावी  अशी  मागणी  स्थानिक  मच्छिमारांकडून  करण्यात  येत  आहे.

मालवण  मधील संतोष देसाई मासेमारी करण्यासाठी आपल्या मालकीची 'पवणाई' नौका  घेवून समुद्रात  गेले असता, मध्यरात्री 1 वाजता 15 ते  16  हायस्पीड  नौका  आल्या  आणि  त्यांच्या  जाळ्यावरुन  गेल्या  त्यामुळे संतोष यांना  तब्बल  एक  लाख  रुपयांचे  नुकसान  झाले  आहे.      

संबंधित बातम्या