ऊस उत्पादनात भारत अग्रेसर तर महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा
ऊस उत्पादनDainik Gomantak

ऊस उत्पादनात भारत अग्रेसर तर महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

महाराष्ट्रात प्रथमच 138 टन साखरेचे उत्पादन

देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून यंदाच्या आकडेवारी नुसार ऊस उत्पादनात भारताने पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच महाराष्ट्राने ही ऊस उत्पादनात चीन, रशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया या देशांनाही मागे टाकले आहे. तर भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊस आणि साखर उत्पादक देशांमध्येही पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ( India became top in sugarcane production while Maharashtra is largest contributor )

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदायक बातमी असून. यंदा महाराष्ट्रात विक्रमी उसाचे उत्पादन झाले आहे. दरवर्षी साखर उत्पादनाचा कालावधी ऑक्टोबर ते एप्रिल असा असतो, असे असले तरी यावेळी उसाचे चांगले पीक असल्याने हा कालावधी 15 जून म्हणजेच 45 दिवसांनी वाढवण्यात आला.

ऊस उत्पादन
गुणरत्न सदावर्ते यांचा शरद पवारांवर घणाघात

साखर आयुक्तालयाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात प्रथमच 138 टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यासोबतच यावेळी 134 कोटी लिटर इथेनॉलही तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्राने चीन, रशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया या ऊस उत्पादक देशांना मागे टाकले आहे. ब्राझीलनंतर महाराष्ट्र हे दुसरे मोठे ऊस उत्पादक राज्य बनले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊस आणि साखर उत्पादक देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ऊस उत्पादन
Maharashtra SSC Result 2022: दहावीच्या निकालात मुलींची बाजी, एकूण निकाल 96.94 टक्के

यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन होते. एफआरपीद्वारे यंदा तब्बल 37 हजार 712 कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. तर इथेनॉलमुळे 45 हजार कोटींचे परकीय चलन वाचले, देशातील 30 टक्के ऊस महाराष्ट्राचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com