इंडिगो विमानाने प्रवासादरम्यान केली नागपुरात आपत्कालीन लँडिंग; तरीही दुर्घटना टळली नाही

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो विमानात प्रवास करत आसलेल्या या प्रवाशाच्या मृत्यूची  घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो विमानाने प्रवास करणाऱ्या 65 वर्षीय प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

नागपूर: इंडिगोच्या चेन्नई ते दिल्लीच्या विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या मृत्यूची बातमी सध्या पुढे आली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बिहार राज्यातील गया येथील रहिवासी छोटूसिंह नारायण सिंह यादव शनिवारी सकाळी चेन्नईहून विमानात चढले. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे या विमानाचे आपत्कालीन लँडिंग नागपुरात करण्यात आले.

दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो विमानात प्रवास करत आसलेल्या या प्रवाशाच्या मृत्यूची  घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो विमानाने प्रवास करणाऱ्या 65 वर्षीय प्रवाशाची तब्येत बिघडल्यामुळे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. मात्र, प्रवाशाचा विमानातच मृत्यू झाला. काल रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली. शनिवारी ही घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले.

सोनेगाव पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बिहारमधील गया येथे राहणारे छोटूसिंह नारायण सिंह यादव शनिवारी सकाळी चेन्नईहून विमानात चढले. तथापि, उड्डाणा दरम्यान त्यांनी तब्येत बिघडल्याची तक्रार केली, त्यानंतर नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाने आपत्कालीन लँडिंग केली.

सिंग यांनी सांगितले की, यादव यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या