रुग्णवाहिका चालवणाऱ्या अनिता यांची प्रेरणादायी कहाणी

दैनिक गोमंतक
शनिवार, 17 एप्रिल 2021

कोरोना काळात माणसाच्या मदतीला अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी अगदी देवदूतासारखे धावून आलेले पाहायला मिळाले आहे.

कोरोना संक्रमणाला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे आपल्यातील अनेक जण सध्या घरात बसलेले असतील, कोरोना काळात माणसाच्या मदतीला अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी अगदी देवदूतासारखे धावून आलेले पाहायला मिळाले आहे. अत्यावश्यक सेवेतील अशा या कर्मचाऱ्यांच्या अनेक कहाण्या आपण लॉकडाऊन काळात ऐकत आलो आहोत. अशीच एक प्रेरणा देणारी कहाणी पुण्याच्या अनिता गोसावी यांची देखील आहे. (Inspirational story of Anita driving an ambulance)

आज आपल्याला महिला सर्वच क्षेत्रात पुढे असलेल्या पाहायला मिळतात. महिलांच्या कार्यक्षमतांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसते आहे. अशाच पद्धतीने आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर धाडसी पाऊल टाकत काम करता आहेत अनिता गोसावी. देशात कोरोना संसर्गामुळे (Corona Second wave) निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे मागील वर्षी अनेकांनी आपल्या अप्तेष्टाना गमावले आहे. असाच एक प्रसंग अनिता यांच्यावर ओढवला होता. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णवाहिका चालक असलेल्या अनिता यांच्या भावाला कोरोना  झाला होता. त्यावेळी रुग्णवाहिका मिळत नसल्याने त्यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत आपल्या भावाला रुग्णालयात पोहोचवले होते. त्यावेळेपासून अनिता यांनी रुग्णवाहिका चालवायला सुरुवात केली असल्याचे अनिता यांनी सांगितले आहे. 

धक्कादायक! ऑक्सिजन अभावी दीड तासात गोंदियात 15 जणांचा मृत्यू

प्रत्येकालाच आपल्या जीविताची चिंता असलेल्या या काळात घराबाहेर पडून थेट कोरोना रुग्णांच्याच (Corona Patient) सहवासात काम करत असताना अनिता गोसावी यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावता आहेत. गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एक मृतदेह घेऊन जेव्हा अनिता गोसावी स्मशानभूमीत आल्या तेव्हा अनेकांनी त्यांच्याकडे आश्चर्यकारकरित्या पहिले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते जावेद खान यांनी दिली आहे. 
 

संबंधित बातम्या