हिंसाचारानंतर अमरावती हळूहळू पूर्वपदावर?

अमरावती (Amravati) शहर वगळता संपूर्ण जिल्ह्यात आज चौथ्या दिवशी संचारबंदी सुरू आहे. तीन दिवस 24 तासांसाठी बंद इंटरनेट सेवा (Internet service) ठप्प करण्यात आली आहे.
हिंसाचारानंतर अमरावती हळूहळू पूर्वपदावर?
अमरावतीत असलेली संचारबंदी Dainik Gomantak

त्रिपुराच्या (Tripura) घटनेनंतर महाराष्ट्रात (Maharashtra) उसळलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ अमरावती शहर बंद करण्यात आले होते. तसेच अमरावतीमध्ये चार दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. अमरावती (Amravati) शहर वगळता संपूर्ण जिल्ह्यात आज चौथ्या दिवशीही संचारबंदी सुरूच आहे. आणि त्यातच आता तीन दिवसांसाठी बंद असलेली इंटरनेट सेवा पूर्ववत होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.

अमरावती येथे हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले माजी कृषिमंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांच्यासह इतर नेत्यांचा जामीन मंजूर झाला आहे. काल सकाळी अमरावती पोलिसांनी अनिल बोंडे, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, भाजप जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी, संघटनेचे नेते तुषार भारतीय अशा 12 नेत्यांना अटक केली होती.

अमरावतीत असलेली संचारबंदी
Lockdown : महाराष्ट्रातील अमरावती मध्ये लॉकडाउनचा मुक्काम वाढला; अत्यावश्यक सेवा राहणार सुरु

त्रिपुरातील घटनेनंतर अमरावती बंद:

बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांनंतर त्रिपुरामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी याचा निषेध केला. दरम्यान, तेथील मशिदींचे नुकसान झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. यानंतर पोलिसांकडून मशीद सुरक्षित असल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आला. यानंतर 12 नोव्हेंबरला अमरावती, नांदेड, मालेगाव येथे मुस्लिम समाजाच्या लोकांनी हजारोंच्या संख्येने मोर्चे काढले. यादरम्यान अनेक दुकानांची तोडफोड, काही लोकांवर हल्ला, दगडफेक अशा विविध घटना घडल्या होत्या. तसेच पोलिसांवरही हल्ले झाले. यामध्ये काही पोलीस जखमी झाले होते.

या घटनांच्या निषेधार्थ भाजपने (BJP) 13 नोव्हेंबरला अमरावती बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान हिंसक घटनाही घडल्या. दगडफेक, दुकानांची तोडफोड. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी (Police) अश्रुधुराच्या नळकांड्या, पाण्याचे फवारे आणि लाठीमार केला आणि ही दंगल शांत केली होती. आणि अमरावती मध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com