महाराष्ट्रीयन तरुणाचा आयर्लंडच्या फेसबुक अधिकाऱ्यांनी वाचवला जीव

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 5 जानेवारी 2021

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातीलत एक तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत थेट फेसबुकवर लाइव्हवर आला. 

धुळे : आजकाल लोकं गुन्हा करण्यास अजिबात संकोच करत नाहीत. या प्रकरणात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ही घटना धुळ्याची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातीलत एक तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत थेट फेसबुकवर लाइव्हवर आला.  युवकाच्या या कृत्याची दखल सोशल मीडिया कंपनीच्या आयर्लंडच्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांनी तातडीने महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीमुळे या तरूणाचा जीव वाचला.  नैराश्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धुळ्यातील तरुणाचा जीव आयर्लंडमधील फेसबुकचे सतर्क अधिकारी आणि मुंबई सायबर पोलिसांनी वाचवला.

ज्ञानेश पाटील असे या (२३) वर्षीय तरुणाचे नाव असून रविवारी रात्री त्याने धुळ्यातील निवासस्थानी आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रसंग त्याने फेसबुकद्वारे सर्वदूर व्हायरल होइल(फेसबुक लाईव्ह) अशी व्यवस्था केली होती. हा प्रकार फेसबुकच्या आर्यलडमधील फेसबुक अधिकाऱ्यांनी पाहून रविवारी रात्री आठच्या सुमारास मुंबईच्या पोलीस उपायुक्त (सायबर) रश्मी करंदीकर यांना कळवले. या तरूणाच्या फेसबुक खात्याला जोडलेले तीन मोबाइल क्रमांकही दिले. नंतर सायबर पोलिसांनी या तरुणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याचे तिन्ही मोबाइल बंद होते. करंदीकर यांनी या तरुणाचा पत्ता शोधण्यासाठी धडपड सुरू केली. सहायक निरीक्षक रवी नाळे यांनी अवघ्या १० मिनिटांत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आणि पत्ता शोधून काढला. ही सगळी माहीती करंदीकर यांनी धुळे येथील महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अधीक्षक पंडित यांना दिली. आणि पुढच्या पाच मिनिटांत धुळे पोलिसांनी ज्ञानेश पाटील चे घर गाठले आणि त्याचा जीव वाचिवला.

तरूणाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि सोमवारी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. त्याचे समुपदेशन केले जाईल, असे  पंडित यांनी सांगितले. "डीसीपी करंदीकर यांनी या तरूणाबद्दलची सर्व तांत्रिक माहिती दिली. आणि त्यांनी तातडीने कारवाई करून त्या तरुणाचा जीव वाचविला."

 

 

संबंधित बातम्या