'कोरोनाची लस आली असली तरी मास्क लावणं सक्तीचं' ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 20 डिसेंबर 2020

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनावरची लस उपलब्ध झाली असली तरी मास्क लावणं सक्तीचं राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनावरची लस उपलब्ध झाली असली तरी मास्क लावणं सक्तीचं राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कोरोनाची तीव्रता कमी झाली असली, तरी संकट अजूनही टळलेलं नाही, त्यामुळे कोरोनापासून रक्षणासाठी घालून देण्यात आलेल्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. नागरिकांच्या शिस्तबद्धता आणि जागरूकतेमुळे कोरोनाची तीव्रता कमा करण्यात आपण यशस्वी झालो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

ठाकरे म्हणाले, आपण नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन पुन्हा लावू शकतो. परंतु लोक बऱ्यापैकी सर्व नियमांचे पालन करत आहेत. जे नागरिक काही खबरदारी घेत नाहीत, अशांमुळे शिस्त पाळणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. युरोपात आजपासून पुन्हा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सणवार, लग्नसराई सुरू झाली असली, तरी गर्दी न करत सर्व नियमांचं पालन करा, असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरेंनी केलं.

संबंधित बातम्या