'जान महम्मदचा डी कंपनीशी जुना संबंध': एटीएस प्रमुख

मात्र तो मुंबईतून पाकिस्तानात जाण्यासाठी निघाला होता. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. मात्र त्या सहापैकी एकजण धारावी मध्ये राहणारा आहे.
'जान महम्मदचा डी कंपनीशी जुना संबंध': एटीएस प्रमुख
Jan MuhammadDainik Gomantak

जान महम्मद आणि महम्मद शेख धारावीमध्ये राहत होते. मात्र त्यांचा संबंध थेट डी कंपनीशी असल्याचे प्रथमदर्शनी समजत आहे. या दोघांनी पाकिस्तानमध्ये जाण्याचा विचार केला होता. त्या दोघांपैकी एक असणारा जान महम्मद मुंबईतून पाकिस्तानात जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. मात्र त्या सहापैकी एकजण धारावी मध्ये राहणारा आहे. जान महम्मद मुंबईतून राजस्थानमार्गे पाकिस्तानला जाण्यासाठी एकटाच निघाला होता. मात्र त्याला राजस्थानमध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केली. जान महम्मदचा मागील अनेक दिवसांपासून डी कंपनीशी संबंध होता. जानकडून अधिक माहिती गोळा करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसची टीम दिल्लीला रवाना झाली आहे.

Jan Muhammad
'15 दिवसात तपास पूर्ण करु': मुंबई पोलिस आयुक्त

मागील वीस वर्षापासून त्याचा पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समजत आहे. मात्र जान महम्मदकडे कोणत्याही प्रकारचा शस्रसाठा अद्याप मिळालेला नाही. कारावाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिसांना फ्री हॅन्ड दिलेला आहे. जान महम्मदच्या हालचालीवर महाराष्ट्र एटीएसचं मागील अनेक दिवसांपासून लक्ष्य होतं. राजस्थानमधील कोटामधून जान महम्मदला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com