Konkan Railway: जोरदार पावसामुळे तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रद्द

हाय टाईड, मुसळधार पाऊस आणि कोयनेचे वाढलेले पाणी यामुळे वशिष्ठी नदीला पूर आला.
Konkan Railway
Konkan RailwayDainik Gomantak

सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस (heavy rain konkan) सुरु असुन अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायाला मिळते आहे. पावसाच्या या तडाख्यामुळे चिपळूणमधील वशिष्ठी नदीला पुर आला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे हे रेल्वेच्या पुलावा पाणी लागले. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणुन, रेल्वे प्रशासनाने त्या मार्गाने जाणाऱ्या सर्व गाड्या स्थानकावर थांबवल्या आहेत. जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस (janshatabdi express cancelled) रद्द केरण्यात आली असुन, चार गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. (janshatabdi and Tejas express cancelled due to heavy rain)

हाय टाईड, मुसळधार पाऊस आणि कोयनेचे वाढलेले पाणी यामुळे वशिष्ठी नदीला पूर आला. चिपळूण शहर परिसरात प्रचंड पाणी साचले. वशिष्ठी नदीवर असलेल्या रेल्वे पुलाला पाणी लागले. विशेष म्हणजे या ठिकाणी धोक्याचा इशारा देणारी अत्याधुनिक यंत्रणा लावलेली असल्यामुळे पुराचा धोका लक्षात घेऊन कोकण रेल्वेकडुन ही रेल्वे वाहतुक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार खेर्डी स्थानक आणि आजुबाजूच्या परिसरात असणाऱ्या रेल्वे रुळावरुन पाणी वाहत होते.

Konkan Railway
Konkan Railway: मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा बिघडले

पाण्याची पातळी एवढी होती कि, रुळ सुद्धा दिसत नव्हता. एर्नाकुलम-निजामुद्दीन संगमेश्‍वरला, मंगरुळ-सीएसटीएम कामथेला, तिरुवअनंतपूरम विलवडेत, तिरुवनेली-दादर राजापूरात, अमृतसर रत्नागिरीत, तिरुवअनंतपुरम वेर्णा स्थानकात, मांडवी मडगावला तर दादर-सावंतवाडी चिपळूण, मुंबई-मडगाव जनशताब्दी खेड स्थानकात थांबवण्यात आली होत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com