"निवडणूका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात"; हे काय नियोजन आहे का?

दैनिक गोमंतक
बुधवार, 12 मे 2021

पेट्रोल डिझेल दरवाढीवरून जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांनी (Petreol Diesel Rates) अनेक ठिकाणी शंभरी पार  केली असल्याचे पाहायला मिळते आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका (Assembly Elections) सुरु असताना नियंत्रणात असलेले इंधनाचे दर, निवडणूक संपून निकाल लागताच पुन्हा वाढले आहेत. महाराष्ट्रात सध्या पेट्रोलचे दरांनी शंभरी पार केली आहे. याच  पार्श्वभूमीवर महाविकास अगदी सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर  (Central Government) आहे. यावेळी जयंत पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका करत , प्रश्न उपस्थित केले आहेत. (Jayant Patil has criticized the central government over petrol and diesel price hike.)

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन? 

महाराष्ट्राच्या अनेक  शहरांत पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून, काही ठिकाणी पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत असल्याचे पाहायला मिळते आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली आहे. "निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका संपल्या की दरवाढ ठरलेलीच! हे काय वित्त नियोजन आहे का?" असे म्हणत जयंत पाटील यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना धारेवर धरले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सध्या पेट्रोलचे दर ९८.३६ रुपये लिटर एवढे असून, डिझेल ८९.७५ एवढे असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील परभणी शहरात पेट्रोल आणि डिझेल सर्वात जास्त दराने मिळते. परभणीत पेट्रोलचे दर १००.७५ रुपये तर डिझेलचे दर ९०.६८ रुपये लिटर एवढे आहेत.  
 

संबंधित बातम्या