जेम्स लेन प्रकरणावरुन आव्हाडांनी राज ठाकरेंना फटकारलं

बाबासाहेब पुरंदरे हे काही फिलॉसॉफर नव्हते - जितेंद्र आव्हाड
जेम्स लेन प्रकरणावरुन आव्हाडांनी राज ठाकरेंना फटकारलं
Jitendra AwhadDainik Gomantak

मुंबई : राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत भोंगा आणि हनुमान चालिसा मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्य सरकारला सुनावलं असून राज्यसरकारने याबाबत ताडीने निर्णय घ्यावा अन्यथा समाजात तेढ निर्माण होईल. असे ही ठाकरे म्हणालेत. या सभेदरम्यान उपस्थितांना संबोधित करताना जेम्स लेन प्रकरणावर ही भाष्य केलं होत. याच मुद्यावरुन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. (Jitendra Awhad criticizes Raj Thackeray )

Jitendra Awhad
मुंबईहून निघालेल्या स्पाइसजेटच्या विमानाचा अपघात, 40 प्रवासी जखमी

मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात असतानाच आव्हाड यांनी जेम्स लेन प्रकरण आम्ही बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर कधीच चर्चेत आणलं नाही असं म्हटलंय. तसेच आव्हाड यांनी आमचा पुरंदरेंविरोधातील वैचारिक संघर्ष त्यांच्या मृत्यूनंतर संपुष्टात आल्याचं म्हटलंय. या सभेदरम्यान ठाकरे यांनी अनेक मुद्यावरुन राज्य सरकारला धारेवर धरले असून ईद झाल्यानंतर तातडीने पोलीसांनी सामंजस्याने मशीदीवरील भोंगे उतरवावेत अन्यथा या समोर हनुमान चालीसा लावली जाईल असं ते म्हणालेत.

Jitendra Awhad
तेव्हा शिवसैनिक कुठे होते? फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंना थेट प्रश्न

तर आव्हाड यांनी बोलताना बाबासाहेब पुरंदरेंच्या मृत्यूनंतर आम्ही आईसाहेबांच्या चारित्र्याबद्दल बोलणाऱ्या जेम्स लेनचा विषय कधी काढलाच नाही. आमच्या चर्चेतला भागच नाही तो विषय. माणूस जिवंत असताना त्याच्या विचारांशी वैचारिक संघर्ष करायचा असतो,” तेसच बाबासाहेब पुरंदरे हे काही फिलॉसॉफर नव्हते असे ही ते यावेळी म्हणालेत. त्यामूळे राज्यातील राजकिय वातावरण पुन्हा तापत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.