केतकी चितळेच्या पोस्टवरुन जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले...

महाराष्ट्रात 100-200 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार
Jitendra Awhad
Jitendra AwhadDainik Gomantak

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये शरद पवार यांचे वय, शारीरिक व्याधी यावरुन आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. या प्रकरणी तिच्यावर कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. ( Jitendra Awhad's reaction from Ketki Chitale's post said ... )

Ketki Chitale
Ketki Chitale Dainik Gomantak

याबाबत बोलताना आव्हाड यांनी म्हटले आहे कि, “केतकी चितळे इतकी विकृत असेल याची कल्पनाही करवत नाही. आपल्या स्त्रीत्वाचा फायदा घेत काहीही लिहू शकतो. असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे.तिने काय लिहिले आहे ते लोकांना वाचावे आणि तेच तुमच्या आजोबांबद्दल किंवा वडिलांबद्दल लिहिले तर काय वाटेल याचा विचार करा.

Jitendra Awhad
काश्मिरी पंडितांच्या दु:खावर भाजपाने राजकीय पोळ्या भाजल्या - सचिन सावंत

त्या माणसासोबत राजकीय दृष्ट्या लढा. त्याला आम्ही उत्तर देतो. तुम्ही त्यांचा चेहरा कसा झालाय यावर बोलणार असाल तर उद्या आमच्या कार्यकर्त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या तर तुम्हाला ओरडता येणार नाही,” असे जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना म्हटले आहे.

Jitendra Awhad
राणा दांपत्याने दिल्लीत केले हनुमान चालीसाचे पठण

माझ्यासारखा माणूस जो शरद पवारांसोबत ३५ वर्षे आहे तो हे कसे काय सहन करेल.आज महाराष्ट्रात १००-२०० पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहेत. शेवटी ते राष्ट्रवादीच्या कुटुंबाचे बाप आहेत. असे ही त्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com