कोल्हापूर ते मुंबई प्रवास होणार फक्त सहा तासांत

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

देशातील बहुतांश रेल्वे मार्गांवरील रेल्वे या आगीमी काळात वीजेवर चालणार असून, यामुळे कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास कमी वेळेत करता येणार आहे.

कोल्हापूर – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदरात फार काही पडलं नसलं, तरी पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईला यायचा प्रवास हा जलद होणार आहे. काल सादर करण्यत आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रोसाठी साडे पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

धक्कादायक! लहान मुलांना पोलिओ लस म्हणून देण्यात आले सॅनिटायझर  

देशातील बहुतांश रेल्वे मार्गांवरील रेल्वे या आगीमी काळात वीजेवर चालणार असून, यामुळे कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास कमी वेळेत करता येणार आहे. याचा फायदा मुंबई-पुणे-मिरज-कोल्हापूर यादरम्यान येणाऱ्या स्थानकांनादेखील होणार आहे. पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण होऊन,त्याची चाचणीदेखील घेण्यात आली आहे.  

गोवा राज्य बनावटीच्या विदेशी मद्यसाठ्यावर धाड

देशातील रेल्वेंच्या विद्युतीकरणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे देशभरातील बहुतांश रेल्वेचं विद्युतीकरण होण्याची शक्यता असल्यामुळे कोल्हापूर - मिरज रेल्वे वीजेवर धावतील. असे झाल्यास, कोल्हापूर ते  मुंबई प्रवास अवघ्या सहा तासांचा होणार आहे. कोकण रल्वेशी कोल्हापूरला जोडण्याविषय़ी अद्याप तरी काही घोषणा करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या