'काका-पुतण्याच्या’ टोळीने कब्जा केलेली जमीन अखेर खंडोबा भक्तांना मिळाली

श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा केलेली 113 एकर जमीन मोकळी केली.गोपीचंद पडळकर यांनी मानले आभार.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarDainik Gomantak

सोलापूर: श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या जमिनी काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे (Mulshi pattern)मिळवली होती. ती कब्जा केलेली 113 एकर जमीन पुन्हा परत मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. त्याबद्दल कोर्टाचे आभारी आहोत, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court)आभारी आहोत. कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा केलेली 113 एकर जमीन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे, असं पडळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे कुणाचे पितळ उघडे पडणार यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सोलापूर : माढा येथून औषोधपचारासाठी कर्नाटकात गेलेल्या क्रुझर गाडी आणि बसची धडक होऊन चारजणांचा मृत्यू.

पवार कुटुंबीयांकडे लक्ष:

पडळकर यांनी ट्विटमध्ये कुठेही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि अजित पवार (Ajit Pawar)यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, त्यांनी पवार कुटुंबीयांच्या दिशेने सूचक इशारा केला आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com