हसन मुश्रीफ आणि परीवाराचा 127 कोटींचा घोटाळा; किरीट सौमय्यांचा आरोप

हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्याच्या माध्यमातून मनी लॉंन्डिंग करण्यासंबंधीचे कागदपत्रे इन्कम टॅक्स विभागाला दिले आहेत.
हसन मुश्रीफ आणि परीवाराचा 127 कोटींचा घोटाळा; किरीट सौमय्यांचा आरोप
Hasan Mushrif & Kirit Somaiya Dainik Gomantak

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आघाडी सरकाररमध्ये कोणत्या मंत्र्यांच्या नावाचा गौप्यस्फोट करणार असल्याचे मागील काही दिवसांपासून सांगण्यात येत होते. ठाकरे सरकारमधील ज्या आकरा मंत्र्यांची नावे यापूर्वी घोषीत केली होती. अनिल देशमुख, अनिल परब, यशोमती ठाकूर आणि आता हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्याच्या माध्यमातून मनी लॉंन्डिंग करण्यासंबंधीचे कागदपत्रे इन्कम टॅक्स विभागाला दिले आहेत.

सीआरएम कंपनी प्रविण अग्रवाल हे ऑपरेट करतात. हसन मुश्रीफ यांच्या मुलाने दोन कोटीचे कर्ज घेतले आहे. त्याच कंपनीमधून निवडणूकीसाठी फॉर्म भरला होता. त्यांनी निवडणूक कागपत्रांमध्ये हे दाखवले आहे की, त्यामध्ये दोन कोटी 64 लाख रुपये संपत्ती दाखवली आहे. दुसरी कपंन्यामध्ये तीन कोटीची संपत्ती दाखवली आहे.

 Hasan Mushrif  & Kirit Somaiya
ठाकरे सरकारमधील आणखी दोन मंत्र्यांचा करोडोंचा घोटाळा, किरीट सोमय्यांची आज पत्रकार परिषद

त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांनी निवडणूक इलेक्शन फॉर्ममध्येही संपत्ती नमूद केली आहे. त्यामध्ये तब्बल तीन कोटीची संपत्ती त्याचबरोबर कारखाण्यामध्ये सायरा मुश्रीफ यांच्या नावावर तब्बल तीन कोटीचे शेअर्स दाखवण्यात आले आहेत. 127 कोटीच्या रकमेच्या घोटाळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. मात्र या दोन कंपन्या कधीच बंद झालेल्या आहेत. उद्या मी मुंबई इडीकडे तक्रार करणार आहे. त्याचबरोबर दिल्लीमध्ये अर्थमंत्रालयाकडे तक्रार करणार आहे. माझ्याकडे दोन मंत्र्यांच्या कंपन्यांची फाईल तयार होती. कालांतराने ठाकरे सरकारच्या आणखी नव्या मंत्र्यांची नावे समोर आणणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com