अंबाबाई मंदिरात बॉम्ब? भाविकांमध्ये भीतीचे वातावरण

भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने दर्शन तात्काळ बंद केले आहे.
अंबाबाई मंदिरात बॉम्ब? भाविकांमध्ये भीतीचे वातावरण
Ambabai TempleDainik Gomantak

कोल्हापूर: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर अंबाबाई मंदिर परिसरात मोठी बॉम्ब ठेवल्याचा फोन आला. त्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन कंट्रोल रूमला आला. पणजी (गोवा) कंट्रोल रूमला अज्ञाताने केला फोन करून बॉम्ब (Bomb) बद्दल माहिती दिली. या निनावी फोनमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाविकांसाठी मंदिर (Temple)प्रशासनाने दर्शन तात्काळ बंद केले आहे. तसेच मंदिर परिसरातील सर्व भाविकांना तेथून बाहेर काढण्यात आले आहे.

Ambabai Temple
Navaratri Nine Color 2021: नवरात्रीच्या नऊ रंगांचा उत्सव

आज जवळपास 30 हजार भाविकांनी ऑनलाईन बुकींग केले होते. तसेच अनेक भाविक गेटवरच आहेत.

बॉम्ब शोध पथकाकडून मंदिर परिसराची तपासणी सुरू केली आहे. तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी तैनात आहेत. याबाबत सर्व चौकशी व तपासणी सुरू आहे.

मंदिर परिसरात सर्वत्र पहाणी केल्यानंतर तेथे काहीच आढळून आले नाही. अशी चुकीची अफवा पसरणव्यात आली होती. आता पूर्ववत दर्शन सुरू केले आहे.

Related Stories

No stories found.