कोल्हापूरचा पॅटर्नच वेगळा; शौचालय घोटाळ्याची चौकशी व्हावी म्हणून पंचायत समिती सदस्याचे अर्धनग्न आंदोलन

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्य प्रवीण वसंत जनगोंडा यांनी जिल्हा परिषदेत आज अर्धनग्न आंदोलन केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयांची चौकशी व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर- जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्य प्रवीण वसंत जनगोंडा यांनी जिल्हा परिषदेत आज अर्धनग्न आंदोलन केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयांची चौकशी व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या यांच्या दालनासमोर हे आंदोलन झाल्याने पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली.

 कोल्हापूर हातकणंगले तालुक्यात बांधण्यात आलेल्या  2250 शौचालयांपैकी अनेक शौचालये बेकायदेशीर आणि बोगस असल्याचा आरोप प्रवीण वसंत जनगोंडा आणि सहकाऱ्यांनी केला. यात झालेल्या  भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी जनगोंडा यांची मागणी केली आहे.

 तालुक्यात शौचालय अनुदानात घोटाळा झाला आहे, या घोटाळ्याची चौकशी करावी या मागणीसाठी जनगोंडा यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या दालनात अर्धनग्न आंदोलन केले. गुरुवारी जनगोंड यांनी याबाबत निवेदन दिले होते. मात्र, याबाबत कार्यवाही झाली नसल्याने हे आंदोलन करण्यात आले

संबंधित बातम्या