Kolhapur:पंचगंगेचे पात्र पुन्हा ओव्हर फ्लो, लोकांना सावधानतेचा इशारा

पंचगंगा नदीने (Panchganga river) धोक्याची पातळी ओलांडली असून, सध्या याची पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील एकूण 17 बंधारे पाण्याखाली आहेत.
Kolhapur:पंचगंगेचे पात्र पुन्हा ओव्हर फ्लो, लोकांना सावधानतेचा इशारा
पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून,नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. Dainik Gomantak

कोल्हापूर: कोल्हापूरातील (Kolhapur) पंचगंगा नदीचे (Panchganga river) पात्र ओव्हर फ्लो (Overflow) झाले असून, याचे पाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर आले आहे. पावसाचा (rain) जोर वाढल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीच झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत नदीची पाणी पातळीत तीन फुटांनी वाढली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असल्याने, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा (A warning to the people) देण्यात आला आहे. (Kolhapur: Panchganga characters overflow again, warning people-smk85)

कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. पश्चिमेकडील भागात पावसाचा जोर जास्त असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत पंचगंगेच्या पाण्यात तीन फुटांनी वाढ झाली आहे. जूनच्या शेवटाला जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्याने त्यामुळे पाणलोट क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे.

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून,नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
Monsoon Update : महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांत रेड अलर्टचा इशारा

सततच्या पावसाने धरणातून सोडलेले पाण्यामुळे नदीच्या पातळीत वाढ झाली, काल रात्रीपासून या भागात पावसाचा जोर आणखीन वाढला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सकाळी 7 ला पंचगंगेत पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे राजाराम बंधाऱ्याची 28 फुट 10 इंच इतकी वाढली आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, सध्या याची पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील एकूण 17 बंधारे पाण्याखाली आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com