Kolhapur: कोल्हापूर शिवसेना शहर प्रमुखासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा

गणेश विसर्जनात घडलेल्या प्रकारावरून शिंदे गटाच्या शहर संघटकांकडून तक्रार दाखल
Kolhapur: कोल्हापूर शिवसेना शहर प्रमुखासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा

गणेश विसर्जन मिरवणुकीत घडलेल्या प्रकारावरून, कोल्हापूर शिवसेना (Kolhapur Shivsena) शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या शहर संघटकांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर जुना राजवाडा पोलिस (Old Rajwada Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kolhapur: कोल्हापूर शिवसेना शहर प्रमुखासह 40 शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा
Goa church pastor's speech viral: आठ आमदारांच्या पक्षांतरावर गोव्यातील पाद्रीचे भाषण चांगलेच व्हायरल

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीत पापाची तिकटी परिसरात मंडळाच्या स्वागतासाठी अनेक मंडप उभारण्यात आले होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या राजे क्षीरसागर यांच्याकडूनही पान सुपारी मंडप उभारण्यात आला होता. या मंडपासमोर शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले अध्यक्ष असलेल्या फिरंगाई तालीम मंडळाची मिरवणूक आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली.

विसर्जन मिरवणुकीत नागरिकांनी मंडपाच्या व्यासपीठावरील महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन, हातवारे आणि शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दाखल तक्रारीवरून गुरूवारी उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com