Sindhudurg: चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांना कुडाळ पोलिसांचे नोटीस

याप्रकरणी भाजपनं तक्रार दाखल केली होती.
Bhaskar Jadhav
Bhaskar JadhavDainik Gomantak

आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना कुडाळ (Kudal) पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुडाळमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात अपमानकारक आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी भाजपनं तक्रार दाखल केली होती.

Bhaskar Jadhav
Dalip Tahil: बॉलिवूडमधील दमदार अभिनेता दलीप ताहिल; जाणून घ्या ताहिल यांच्याबद्दल खास गोष्टी

आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनात कुडाळमध्ये महाविकास आघाडीनं मोर्चा काढला होता. कुडाळमधील सभेत ठाकरे गटाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल प्रक्षोभक आणि चिथावणी देणारी वक्तव्ये केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता कुडाळ पोलिसांनी अटकेसंदर्भातील भास्कर जाधव यांना नोटीस बजावली आहे.

Bhaskar Jadhav
Goa Football Association: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कायतान फर्नांडिस

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संपत्ती संदर्भात विवरण आणि तपासाला सहकार्य करण्यासाठी नोटीस बजावली होती. याचाच विरोधात आणि आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनात कुडाळमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. कोकणात राणे आणि नाईक यांच्यातील वाद वाढत असताना आता भास्कर जाधव यांना देखील पोलासांची नोटीस आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com