ट्रेनद्वारे अडीच लाख  कामगारांची पाठवणी

Dainik Gomantak
रविवार, 17 मे 2020

लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून राज्यात अनेक कुशल, अकुशल कामगार अडकून पडले होते. त्यांच्या विनंतीनुसार लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून, 191 ट्रेनने 2 लाख 55 हजार 60 कामगार, मजुरांची पाठवणी त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली.

मुंबई

 लॉकडाऊनमुळे राज्यात अडकून पडलेल्या परराज्यांतील जवळपास दोन लाख कामगारांची पाठवणी विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून राज्यात अनेक कुशल, अकुशल कामगार अडकून पडले होते. त्यांच्या विनंतीनुसार लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून, 191 ट्रेनने 2 लाख 55 हजार 60 कामगार, मजुरांची पाठवणी त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली. पश्‍चिम बंगालमध्ये एकही ट्रेन गेली नव्हती व बिहारमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या. खासदार शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्तीशः पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना फोनद्वारे विनंती केली. त्यानंतर त्यांनी परवानगी दिली. शनिवारी (ता.16) सकाळी 8.15 वाजता पश्‍चिम बंगालसाठी बांद्रा ते हावडा ही पहिली विशेष रेल्वे ट्रेन सोडण्यात आली. या दोन्ही राज्यांसाठी प्रत्येकी कमीत कमी दहा-दहा ट्रेन दररोज सोडण्याची गरज आहे. 

खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून
परप्रांतीय कामगारांना पाठविण्याचा सर्व खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येत आहे. यासाठी एकूण 54.70 कोटी रुपये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले आहेत; तर राज्यात जवळपास 3 हजार 884 शेल्टर असून, यामध्ये 3 लाख 71 हजार कामगार आहेत. त्यांची जेवण खान सर्व व्यवस्था राज्य सरकार करत आहे, अशी माहितीही देशमुख यांनी यावेळी दिली.
 

संबंधित बातम्या